Monday, 26 May 2025

 पुस्तक प्रेमी ग्रुप मध्ये डॉ करंबळेकर ह्यांच्या मार्गदर्शनाखाली जुलै 2024 ला आले आणि ह्या परिवाराचा हिस्सा झाले. 

रोज एक नवीन शिकवण/ विचार पदरात पडतात. आपण वाचक म्हणुन अजुन किती मागे आहो,कक्षा किती वाढवली पाहिजे ही जाणीव दररोज होते.


ह्या समूह मार्फत अनेक दिग्गजांची ओळख झाली. नोव्हेंबर 2024  ला नवा परिचय मध्ये भाग घेतला आणि भरभरून प्रेम मिळाले.आपण लिहु शकतो हा आत्मविश्वास आला.पंडित मॅडम सारखे दिग्गज जेव्हा स्वतः फोन करून दाद दिले तेव्हा भरून पावले.

चंद्रकांत टिळक, गिरीश टिळक या सारखे अवलिया जेव्हा मला छोट्या बहिणी समान सांभाळून घेत बोलतात तेव्हा धैर्य येते. माझे आवडते प्रवास वर्णन लेखक जयप्रकाश प्रधान, गुजराती भाषा शिकण्यात मदत केलेले कौशल लेले इत्यादी दिग्गज ग्रुप मध्ये आहेत हे पाहून खुप आनंद झाला.


डॉ.लवेकर, डॉ.श्रोत्री असे दिग्गज डॉक्टर cum लेखक पाहिले की स्फुरण येते.मला पण जमेल असे वाटते.


दिवटे सर, मालुरकर सर  प्रेमाने ग्रुप वरच्या चुका सांभाळून घेतात.

ग्रुपमुळे माझ्या जपान वरील प्रकाशित केलेल्या पुस्तकाला काही वाचक मिळाले.एक फसवणूक ही झाली. पण त्याला गाठीशी अनुभव या दृष्टिकोनातून बघून मी पुढे जायचे ठरवले.दिवटे सरांनी त्या प्रवासात खूप मार्गदर्शन केले आणि साथ दिली.


तसेच या ग्रुपच्या माध्यमातून विश्व मराठी परिषद ,गुंतवणूक माझ्यासाठी ,चंद्रशेखर टिळक यांची व्याख्याने इत्यादी अनेक उपक्रमाबद्दल माहिती मिळाली आणि अनेकांशी जोडले गेले. तसेच उत्तम उत्तम पुस्तकांची माहिती मिळवून माझा वैयक्तिक पुस्तकांचा संग्रह समृद्ध करण्यास मला खूपच मदत झाली.


रोज सकाळी येणारा एक नवा परिचय टॉनिकचे काम करतो आणि एक वेगळी स्फुरण आणि ऊर्जा देऊन जातो .कधी कधी वाचक म्हणून मी किती कमी पडते याची जाणीव करून देतो तर कधी वाचलेले पुस्तक असेल तर त्याच्याकडे बघण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन करण्यास मदत होते.


या समूहामुळे पुस्तक फक्त वाचण्यासाठी नाही तर परिचयाच्या दृष्टिकोनातून किंवा आपला विचार इतरांसमोर मांडण्याच्या दृष्टिकोनातून पुस्तकाचे आकलन करण्याची वाचण्याची पद्धत देखील माझी प्रचंड बदलली आहे.टिळक सरांकडन स्फुरण घेऊन अटलिस्ट वर्षाच्या शेवटपर्यंत 60 पुस्तके वाचण्याचा संकल्प आहे.त्यातील 22 पुस्तके वाचून झाली आहे. उर्वरित संकल्प लवकरच पूर्ण होईल असे वाटते.


  दोन जून पासून संपूर्ण सप्ताहाचा परिचय देण्याचे शिवधनुष्य उचलणार आहे. आशा करते की ते मी आत्तापर्यंतच्या या समूहाच्या असलेल्या समृद्ध परंपरा अखंड ठेवण्याचे कार्य होईल. 


या समूहाची उत्तरोत्तर प्रगती हो हीच आशा आहे.धन्यवाद.

 पुस्तक प्रेमी ग्रुप मध्ये डॉ करंबळेकर ह्यांच्या मार्गदर्शनाखाली जुलै 2024 ला आले आणि ह्या परिवाराचा हिस्सा झाले.  रोज एक नवीन शिकवण/ विचार ...